मुंबई चा श्रेयस अय्यर करणार भारत "अ " संघाचा प्रतिनिधित्व
- Tejas Borgaonkar
- Oct 2, 2017
- 1 min read
सोमवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी BCCI ने न्युझीलंड "अ" विरुद्ध ५ सामान्यांची एकदिवसीय मालिका जाहीर केली, कौतुकाची गोष्ट म्हणजे या मालिकेमध्ये मुंबईचा श्रेयस अय्यर(पहिल्या ३ सामन्यासाठी) आणि दिल्लीचा रिषभ पंत(नंतरच्या २ सामन्यासाठी) भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. हे सर्व सामने विशाखापट्टणम मध्ये ६ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान खेळले जातील.

© Getty Images
पहिल्या ३ सामन्यासाठी भारतीय "अ " संघ: श्रेयस अय्यर(कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, दीपक हूडा, शुभमान गिल, श्रीवत्स गोस्वामी (क्षेत्ररक्षक), शाबाझ नदीम, कर्ण शर्मा, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, बासिल थंपी.
नंतरच्या २ सामन्यासाठी भारतीय "अ " संघ: रिषभ पंत (कर्णधार व क्षेत्ररक्षक), ईश्वरनं, प्रशांत चोप्रा, अंकित बावणे, शुभमान गिल, बाबा अपरिजीत, शाबाझ नदीम, कर्ण शर्मा, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, बासिल थंपी.
त्याशिवाय न्युझीलंड विरुद्ध होणाऱ्या २ एकदिवसीय अभ्यास सामन्यात देखील श्रेयस ला कर्णधारपद मिळाले आहे, हे दोन्ही सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये खेळले जाणार आहेत. (१७ आणि १९ ऑक्टोबर )
बोर्ड प्रेसिडेंट ११ संघ: श्रेयस अय्यर(कर्णधार), पृथ्वी शॉ, रिषभ पंत (क्षेत्ररक्षक), करुण नायर, गुरकीत मानं, मिलिंद कुमार, शाबाझ नदीम, दीपक चाहर, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकत, आवेश खान
Comments